PMPML : पीएमपीएमएलकडून शिवजयंतीनिमित्त भोसरी ते जुन्नर धावणार विशेष बस

एमपीसी न्यूज –  छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण ( PMPML) असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून शिवभक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवितात.या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून शिवभक्तांच्या सोयीसाठी दिनांक 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीकरीता खालील वेळापत्रकाप्रमाणे बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Pune : डॉ. गौरी ब्रम्हे यांच्या हस्ते बीएमसीसीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

बसचे वेळापत्रक

भोसरी ते जुन्नर बस सुटण्याच्या वेळा 5.30, 7.00, 8.30, 10.00, 1.30, 3.00, 4.30, 6.00 (शेवटची बस)

जुन्नर ते भोसरी बस सुटण्याच्या वेळा 9.30, 11.00, 12.30, 2.00, 5.30, 7.00, 8.30,10.00 (शेवटची बस)

तरी या बससेवेचा लाभ शिवभक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाने केले ( PMPML) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.