Pune : नैतिक जबाबदारी स्विकारून, मोदी सरकारने पाय उतार व्हावे- गोपाळ तिवारी 

एमपीसी न्यूज – ‘मनी बिल’च्या  माध्यमातून मोदी सरकारने 2017- 18 च्या बजेट सोबत ( Pune)  आणलेल्या व व्यापक चर्चेशिवाय संमत करवून, वटहुकुमाद्वारे पारीत केलेल्या “इलेक्ट्रॅाल बाँड (निवडणूक रोखे)” संविधानीक दृष्ट्या सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले असून हा मोदी सरकारच्या मनमानीस लावलेली चपराक आहे.

जर निवडणुक रोखे असंवैधानिक व बेकायदेशीर ठरवले असतील तर भाजपने त्यावर लढलेली निवडणुक देखील स्पष्टपणे असंवैधानिक  व बेकायदेशीरच ठरली पाहीजे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची नैतिक जबाबदारी स्विकारून, मोदी सरकारने तातडीने पाय उतार व्हावे, अशी मागणी देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली.

लोकशाहीचा 3 रा स्तंभ असलेल्या “सर्वोच्च न्यायालयाने आपली संविधानाप्रती बांधिलकी सिध्द करून, आपली सक्षमता दर्शवली” ही आजच्या काळांत महत्वपुर्ण घटना आहे. देशवासियां तर्फे सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन व आभार व्यक्त करत ( Pune)  असल्याचे प्रतिपादनही गोपाळ  तिवारी यांनी केले.

PMPML : पीएमपीएमएलकडून शिवजयंतीनिमित्त भोसरी ते जुन्नर धावणार विशेष बस

ते पुढे म्हणाले की, निवडणुक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स – Electoral Bonds) योजना ही घटनात्मक दृष्ट्या अवैध व माहीती अधिकाराचे उल्लंघन करणारी, असल्याचे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हंटले आहे. इलेक्टरॅाल बॉन्डसबाबत भाजपा सरकारने जो निर्णय घेतला, तो सरळ सरळ “भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचा व सत्य दडवणारा” प्रकार होता. कंपन्यांनी कोणत्या ‘राजकीय पक्षाला’ देणगी दिली हे सांगण्याचे बंधन त्यात नव्हते. एखाद्या कंपनीने त्यांच्या हिताचा कायदा पास करून घेण्यासाठी राजकीय पक्षाला काही हजार करोड रुपये किमतीचे “निवडणूक रोखे” देणगी म्हणून दिले, तर त्याची कसलीही चौकशी होणार नव्हती.

निवडणुकीसाठीचा निधी सत्तापक्षाकडे मोठ्या स्वरुपात येण्याचे प्रायोजनच मोदी सरकारने लागू केलेल्या इलेक्टरॅाल बॉन्डसमध्ये असल्याने, हजारो कोटी रुपयांचे बॉन्ड हे फक्त भाजप या एकट्या पक्षाकडे आहे. या इलेक्टरॅाल बॉन्डसचा “मनी लाँड्रिंगसाठी देखील गैरवापर” मोठ्या प्रमाणात होऊ शकतो किंवा झाला आहे, हे स्पष्ट होते.

या इलेक्टोरल बाँड प्रणाली अंतर्गत, हे रोखे “स्टेट बँक ऑफ इंडिया” कडून  देश – विदेशातील नागरीक ही विकत घेऊन ते मर्जीतील राजकीय पक्षांना दान करण्याची मुभा असल्याने “बनावट शेल कंपन्याद्वारे प्रचंड पैसा देशांत मनी लाँड्रींग रुपाने येत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते, काँग्रेस नेते मा राहुलजी गांधी सतत करत होते” त्या आरोपांना या निकालाने पृष्टीच् मिळाली असल्याचेही तिवारी ( Pune)  यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.