Pune : महाराष्ट्रातील मातब्बर मल्ल हडपसरमध्ये दाखल, उद्यापासून रंगणार सेना केसरी कुस्तीचा महासंग्राम 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ( Pune) वाढदिवसानिमित्त येत्या 16  फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी  2024 रोजी पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. चार दिवसीय पार पडत असलेल्या या सामन्यात, राज्यभरातून अनेक मल्ल भाग घेणार असून, मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी व रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत. तब्बल 650 मल्ल यात सहभागी होणार आहेत.

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून, आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024  ही स्पर्धा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, जे. एस. पी. एम. कॉलेज शेजारी, हांडेवाडी, हडपसर पुणे येथे पार पडणार आहेत.

Pune : नैतिक जबाबदारी स्विकारून, मोदी सरकारने पाय उतार व्हावे- गोपाळ तिवारी 

विशेष म्हणजे वियजी मल्लांसाठी ठेवण्यात आलेली, बक्षीसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम 5  लक्ष रुपये , चांदीची गदा व बुलेट मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांकास 3 लक्ष व सन्मान चिन्ह, तृतीय क्रमांकास 2 लक्ष व सन्मान चिन्ह व चतुर्थ क्रमांकास 1 लक्ष व सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.

दरम्यान, भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024  ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व त्यांच्या नियमानुसार होणार असून, या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे. यास्पर्धेचे उदघाटन खासदार डॉ श्रीकांत शिंदे, प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख उपस्थिती ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी/हिंद केसरी अभिजित कटके, मनपा उपायुक्त विकास ढाकणे. बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.