Pune DRM : रेल्वेच्या पुणे डीआरएम कार्यालयातील बैठक ठरली वादळी; 9 खासदारांचा बहिष्कार

एमपीसी न्यूज : पुणे येथील डीआरएम (Pune DRM) कार्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेली रेल्वे प्रशासन आणि खासदार यांच्यातील बैठक वादळी ठरली. 9 खासदार रेल्वेच्या या बैठकीतून बाहेर पडले तर पुढील कोणत्याच बैठकीला न जाण्याचा निर्णय ही या खासदारांनी घेतला.
मागील दोन वर्षांपासून मतदार संघातील प्रवाशांच्या मांडलेल्या प्रश्नावर कोणताच निर्णय झाला नाही. दरवेळी केवळ चर्चा होतात. अंमलबजावणी मात्र होत नाही, त्यामुळे जर आमच्या प्रश्नांना गंभीरपणे घेणार नसाल तर आम्हाला देखील तुमच्या बैठकीत सहभागी होण्यात रस नाही असे सांगत हे खासदार या बैठकीतून बाहेर पडले.
माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. यासंदर्भात पीएम कार्यालयाकडे आणि रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिक माहिती अशी की, रेल्वेचे (Pune DRM) सर्व व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या अध्यक्षतेखाली पुणे व सोलापूर विभागातील रेल्वेच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुणे व सोलापूर विभागात येणाऱ्या कार्यक्षेत्रातील खासदार सहभागी झाले होते. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही प्रवासांच्या हिताची निर्णय घेतले जात नाही. खासदारांचे मत विचारात घेतले जात नाही असे सांगून या सर्व खासदारांनी बैठकीवर बहिष्कार घातला.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील माने, डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, श्रीनिवास पाटील धनंजय महाडिक, ओमप्रकाश भुपाल सिंह उर्फ पवन राजे निंबाळकर, सुधाकर शृंगारे, उमेश जाधव अधिक खासदार या बैठकीला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.