Pune Rain : 1882 नंतर पुण्यात प्रथमच इतका पाऊस म्हणून पुण्यात पाणीबाणी – आयुक्त विक्रम कुमार

एमपीसी न्यूज : 1882 नंतर पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यात इतक्या मोठ्या (Pune Rain) प्रमाणात पाऊस झाला. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 210 एमएम इतका पाऊस झाला आहे. दरवर्षी साधारण पुण्यात 700 एम एम इतका पाऊस असतो. यावर्षी मात्र हा पाऊस 100 एमएम इतका पडला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतानाच थोड्या वेळात जास्त प्रमाणात पडतोय. त्यामुळे हा पाऊस नसून ढगफुटी आहे असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. असे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
सोमवारी पुणे शहरात मुसळधार पाऊस झाला. शहराच्या अनेक भागात या पावसामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप आले होते. तर अनेक वाहने देखील या पावसात वाहून गेली आहेत. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसाला तोंड देण्यासाठी महापालिकेची पूर्वतयारी नव्हती असा आरोप केला जात असतानाच महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

पुणे शहराची ही स्थिती होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मागील पाच वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजपला जबाबदार धरले आहे. यापूर्वीही पुण्याने (Pune Rain) अनेक मोठे- मोठे पावसाळे पाहिले आहेत परंतु त्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात होणारी नालेसफाई यामुळे हा सर्व पाऊस सामावून घेण्याची या पुण्यनगरीची क्षमता होती. परंतु अलीकडच्या काळातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.