Pune Rain Politics : अतिवृष्टीचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण

एमपीसी न्यूज : सोमवारी पुणे शहरात (Pune Rain Politics) झालेल्या मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा शहरातील पावसाळी पूर्व कामाचा कारभार उघडा पडला. या पावसाने पुणेकर अक्षरशः त्रासून गेले होते. तर अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसानही झाले आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने पुणेकर हैराण असतानाच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून मात्र आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे.

पुण्यात पाणी तुंबण्याला एकमेकांच्या काळातील कारभार जबाबदार असल्याचे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते यांनी एकमेकांच्या काळातील उणीधुणी काढली.

सोमवारी झालेल्या परतीच्या पावसानंतर पुणेकर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तर अनेक सोसायटीत वस्त्यात आणि घरात पाणी शिरूर नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने यासाठी एकमेकांना जबाबदार धरले आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून भाजपने पुणे शहराचे वाटोळे केल्याचा घणाघाती राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी अडीच वर्ष कोणाचे पालकमंत्री पद असताना कशी वाट लावली याची उदाहरणे दिली.

अजित पवार यांच्याकडे अडीच वर्ष पुण्याचे पालकमंत्री (Pune Rain Politics) पद होते. या काळात त्यांनी कामे करून का घेतली नाहीत? असा सवाल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतर नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना धान्य आणि इतर सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तर पाण्याचा निचरा का होत नाही याची चौकशी केली जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

तर अजित पवार यांनी भाजपने स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून पुणे शहराचे वाटोळे करून ठेवले आहे असे सांगत भाजपवर घणघाती टीका केली. भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेत त्यांनी काय दिवे लावून ठेवले आहेत त्याची कल्पना अतिवृष्टीमुळे येते असे सांगत अजित पवार यांनी पूर परिस्थितीचे खापर भाजप नेत्यांवर फोडले.

Pune Rain : 1882 नंतर पुण्यात प्रथमच इतका पाऊस म्हणून पुण्यात पाणीबाणी – आयुक्त विक्रम कुमार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.