BNR-HDR-TOP-Mobile

Pune : युतीच्या शासन काळात मागासवर्गीयांच्या विकासाला गती -गिरीश बापट

एमपीसी न्यूज- मागासवर्गीय समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला युतीच्या शासन काळात खर्‍या अर्थाने गती प्राप्त झाली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’ संकल्पनेतून समाजाच्या शेवटच्या स्तरावरील व्यक्तिपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही वचनबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी दिली.

कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट हे बोलत होते सोलापूर बाजार येथे प्रचार फेरीला प्रारंभ झाला. ट्रायलक चौक, गुडलक चौक, भोपळे चौक, बाबाजान दर्गा चौक, सेंट्रल स्ट्रीट, दस्तुर मेहर रोड, गवळीवाडा येथे समारोप झाला.

  • राज्यमंत्री दिलीप कांबळे, आरपीआय (ए)चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक उमेश गायकवाड, विवेक यादव, दीलीप गिरमकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी गिरीश बापट म्हणाले की, स्वयंरोजगारासाठी युवकांना मुद्रा कर्ज, मेक इन इंडियातून सव्वा लाख युवकांना उद्योजक होण्याची संधी, उद्योगधंदे उभारण्यासाठी १५ कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी २० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज सुविधा, ह्दय, कॅन्सर अशा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत मदत, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हानिहाय समित्या, वाल्मिकी-मेहतर समाजाप्रमाणे अनुसूचित जातीतील सङ्गाई कर्मचार्‍यांना नोकरीमध्ये वारसा हक्क, नोकरदार महिलांसाठी ५० तालुक्यांमध्ये वसतिगृह आदी काही महत्त्वाचे निर्णय घेऊन मागासवर्गीयांच्या विकासाला चालना दिली.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3