Pune : गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या -उच्च न्यायालय

एमपीसीन्यूज -गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर (Pune )पोटनिवडणूक घ्या असा आदेश उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला दिला आहे.

संसदेच्या विद्यमान सदस्याच्या निधनानंतर एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवण योग्य नाही असेही उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

Pimpri : भाड्याने नेलेली कार परत न देता फसवणूक

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 10 महिन्यांत निवडणूक (Pune )आयोगानं काहीच का केलेलं नाही?, असा सवाल करत सुघोष जोशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश देत याचिका निकाली काढली.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाकडून यासंदर्भातील याचिका निकाली काढण्यात आली .

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.