Pimpri : भाड्याने नेलेली कार परत न देता फसवणूक

एमपीसी न्यूज – भाड्याने नेलेली कार परत न देता कार मालकाची( Pimpri) फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 27 ऑक्टोबर ते 12 डिसेंबर या कालावधीत मोरवाडी, पिंपरी येथे घडला.

याप्रकरणी कार मालक महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक मगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : वायसीएम रुग्णालयातील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड; बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी (Pimpri)त्यांची दोन लाख रुपये किमतीच्या कारची (एम एच 14/जीएस 6115) झूम कार या कंपनीकडे नोंदणी केली होती. ग्राहकांना भाड्याने कार हवी असल्यास ते ऑनलाईन माध्यमातून कार बुक करतात आणि कार स्वतः घेऊन जातात. ठरलेल्या वेळेत ग्राहक कार परत आणून देतात.

दरम्यान, 27 ऑक्टोबर रोजी आरोपी दीपक मगर याने फिर्यादी यांची कार भाड्याने नेली. ती कार त्याने परत न देता कारचा अपहर केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.