Pune : पुण्यातील कचरा वेचकांचाही शहरी कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये समावेश करण्यात यावा : सुनील कांबळे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राबरोबरच पुण्यातील (Pune)कचरा वेचकांचा शहरी कचरा व्यवस्थापन प्रणाली मध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी राज्यस्तरीय धोरण अंमलात आणावे या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे.

शासनाच्या वतीने या आंदोलनाला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे (Pune )आमदार सुनिल कांबळे उपस्थित होते. नागपुरात हे आंदोलन झाले. पुणे शहरात कचरा वेचकांना न्याय देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

पुणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे काम हे कचरा वेचक करीत असतात. त्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या दूर करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यानी केली.

दरम्यान, पुणे महापालिकेत समावेश झालेल्या कर्मचाऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्या दूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर, कचरा वेचकांच्या अनेक समस्या राज्य शासनातर्फे सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार कांबळे यांनी यावेळी दिले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.