Chikhali : अल्पवयीन मुलाकडे सापडले पिस्टल

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी एका (Chikhali)अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) सायंकाळी रामायण मैदान, जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार सुनील शिंदे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करा; आमदार महेश लांडगे यांची नदी प्रदूषणावर लक्षवेधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामायण मैदान (Chikhali)येथे एक मुलगा आला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रामायण मैदान येथे सापळा लाऊन मुलाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 25 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्टल आणि त्यात एक काडतूस आढळून आले. पोलिसांनी पिस्टल जप्त करत मुलाला ताब्यात घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.