Pune : पुण्यात पिरंगुट घाटात भीषण अपघात; टेम्पोची 6 वाहनांना धडक

सात जण जखमी, जीवित हानी टळली

एमपीसी न्यूज – एका टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात ( Pune ) झाला. मुळशी तालुक्यातील पुणे – कोलाड महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.

याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात चालक गोविंद भालचंद्र लाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. रविवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला असून त्याचे सीसीटिव्ही आता समोर आले आहे.

Pune : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – कोलाड महामार्गावर मुळशी तालुक्यातील पिरांगुट घाट उतारावर सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो टेम्पो वेगात येऊन त्याने रस्त्यावरील पाच दुचाकी आणि एक चार चाकी वाहनांना धडक दिली. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली होती. टेम्पोचा वेग इतका होता की, रत्स्यवरून जाणाऱ्या नागरिकांना पाळायला देखील संधी मिळाली नाही.

या अपघातात सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश असून गंभीर अवस्थेत त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले आहे. उर्वरित सहा जखमींना पिरंगुट तसेच लवळे फाटा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले ( Pune ) आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.