Pune : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला

एमपीसी न्यूज – कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला (Pune ) आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गुंड कधी पळाला, याचे उत्तर कारागृह प्रशासनाकडे नाही . सोमवारी दुपारी कारागृह अधिकाऱ्यांनी जेव्हा तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली, तेव्हा हा प्रकार समोर आला आहे.
Pune : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या तरुणावर ‘एमपीडीए’ कारवाई
आशिष जाधवला पुण्यातील (Pune ) वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2008 साली एका व्यक्तीची हत्या केल्यामुळे अटक करण्यात आली होती.
तेव्हापासून तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. आरोपी जाधवची तुरुंगातील वागणूक पाहता, त्याला येरवडा कारागृह प्रशासनाने (Yerawada Jail) रेशन विभागात काम करण्यासाठी नियुक्त केलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा पोलिसांना संशय(Pune ) आहे.