Pune : घरात घुसून केलेल्या गोळीबारात महिलेचा मृत्यू ; हत्येमागे पतीचाच हात असल्याचा संशय

चंदननगर येथील आनंद पार्क सोसायटीमधील घटना

एमपीसी न्यूज- अज्ञात इसमांनी घरात घुसून महिलेवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी सकाळी साडेसात वाजता चंदननगर येथील आनंद पार्क मध्ये घडली. या हत्येमागे मृत महिलेच्या पतीचाच हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एकता ब्रिजेश भाटी (वय 38) असे मृत महिलेचा नाव आहे. पोलिसांनी पती ब्रिजेश भाटी याला ताब्यात घेतले आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.