Pune : आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन प्रवाशांकडून 35 लाख रुपयांचे परकीय चलन जप्त

एमपीसी न्यूज- पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन प्रवाशांकडून सौदी अरब देशाचे सुमारे 35 लाख 41 हजार रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. कस्टम विभागाचाय पथकाने मंगळवारी (दि. 16) ही कारवाई करण्यात आली.

बालाजी मस्तापुरे आणि मयूर पाटील अशी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची नावे आहेत. दुबईला जाणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने हे दोघे दुबईला निघाले असताना तपासणीमध्ये हे चलन त्यांच्या बॅगेमध्ये आढळून आले. याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता हे चलन आपले नसून दुबई येथे एका व्यक्तीला देण्यासाठी आपल्याला देण्यात आले होते असे त्यांनी सांगितले.

वरील कारवाई पुणे कस्टम विभागाच्या उपायुक्त उषा भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विनिता पुसदेकर, संजय झरेकर या अधिकाऱ्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.