Pune : सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील ठरल्या सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या

एमपीसी न्यूज- पोलिसांकडे नेहमीच गुन्हेगाराचा कर्दनकाळ म्हणून पहिले जाते. त्यांच्याकडे सौंदर्यदृष्टी नसते असा समज सर्वसामान्य नागरिकांचा असतो. पण या समजुतीला छेद देत पुणे पोलीस दलामधील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे.

पुणे शहर पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी सौदर्य आणि बुद्धीमतेच्या जोरावर ‘रिनिंग मिसेस इंडिया 2019’ हा किताब पटकावला आहे. रविवारी(दि. 14) जुलै रोजी पुण्यातील ऑर्किड हॉटेलमध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. नृत्य व हजरजबाबीपणामुळे प्रेम पाटील या स्पर्धेमध्ये सरस ठरल्या

मूळच्या कराड येथील असलेल्या प्रेमा पाटील यांनी एम.कॉम.पर्यंत शिक्षण घेतले आहे. नऊ वर्षांपूर्वी त्या महाराष्ट्र पोलीस दलात सामील झाल्या. त्या कार्बानरी या सामाजिक संस्थेशी संलग्न आहेत. सामाजिक काम करत असताना पुणे व पुण्याबाहेरच्या गरीब गरजू मुलांना त्या शिकवतात. त्यांचा परेड मार्च ते रॅम्प वॉक हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.