Pune : आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून मोफत रुग्णवाहिका

एमपीसी न्यूज – खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर (Pune ) यांच्या निधीतून आणि वासुदेव भोसले भाजपा अध्यक्ष वारजे माळवाडी यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यामुळे कै. पृथक बराटे रुग्णालय अंतर्गत नथुराम दगडु बोडके यांच्या स्मरणार्थ मोफत रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.

रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 07/01/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित केला आहे. यावेळी शांताबाई नथुराम बोडके, आमदार भीमराव तापकीर उपस्थित राहणार आहेत.

Chinchwad : स्मरणिकेतून 100 वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळणार उजाळा

वारजे माळवाडी बस स्टॉप, एनडीए रोड, वारजे माळवाडी पोलिस स्टेशन शेजारी, वारजे माळवाडी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रोहिणी वासुदेव भोसले, वासुदेव शिवाजी भोसले भाजपा अध्यक्ष वारजे माळवाडी, हेमंत नथुराम बोडके मित्र परिवार, समस्त ग्रामस्थ वारजे माळवाडीतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, या मोफत मिळणाऱ्या रुग्णवाहिकेचा सामान्य नागरिकांना फायदा होणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.