Pune dental check up : पुण्यातील गणेशोत्सवात तीन ठिकाणी दंत तपासणी शिबिरे

एमपीसी न्यूज: इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटी पुणे शाखेच्या सुवर्ण महोत्सवास प्रारंभ झाला असून त्यानिमित्त पुण्यातील तीन गणपती मंडळांमध्ये दंत तपासणी, रक्त शर्करा तपासणी शिबिरांचे ,जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.(Pune dental check up) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ येथे 1 सप्टेंबर रोजी पहिल्या शिबिराचे उद्घाटन झाले.या शिबिरामध्ये 125 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळ येथे 1 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. भूषण बांगर (अध्यक्ष, इंडियन प्रोस्थोडोंटिक सोसायटी, पुणे शाखा), डॉ. प्रियम  आदित्य( सचिव) आणि डॉ.विजय मब्रूकर( खजिनदार),संजीव जावळे(अध्यक्ष, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश उत्सव ट्रस्ट ),बाळासाहेब निकम (उपाध्यक्ष) हे उपस्थित होते. (Pune dental check up) 2 सप्टेंबर रोजी भोलेनाथ मित्र मंडळ नारायण पेठ येथे अध्यक्ष दीपक मानकर,डॉ.विजय मब्रुकर  यांच्या उपस्थितीत आणि 3 सप्टेंबर रोजी कामाठीपुरा सार्वजनिक उत्सव मंडळ (कॅम्प) येथे  अध्यक्ष प्रसाद केदारी,नंदकुमार  मोटाडू,निलेश बिलमपल्ली,डॉ.प्रथमेश मोटाडू यांच्या उपस्थितीत दंत तपासणी, रक्तशर्करा  तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या तपासणी शिबिरातून आणि जनजागृती मोहिमेतून ‘गॉड क्रिएटस,वुई रिक्रिएटस’ असा संदेश दिला जात आहे.

Chandani Chowk : चांदणी चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांना गती द्या – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

गणेशोत्सवातील दंत तपासणी शिबिरे डॉ पी.ए. इनामदार(अध्यक्ष,महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी),डॉ.राजेश क्षीरसागर(भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज),डॉ.आनंद शिगली(प्राचार्य,डी.वाय.पाटील डेंटल कॉलेज),  डॉ.डी.गोपालकृष्णन(अधिष्ठाता,डी.वाय.पाटील डेंटल कॉलेज), डॉ. रमणदीप दुग्गल(प्राचार्य,एम.ए.रंगूनवाला डेंटल कॉलेज), आर.ए.शेख(अधिष्ठाता,एम.ए.रंगूनवाला डेंटल कॉलेज) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.