Crime News : घरात सव्वासात लाखांची चोरी करणारी महिला अटकेत

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाज्या वाटे घरातील तब्बल सव्वासात लाखांची चोरी करणारी महिला आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 31 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या एक तासाच्या कालावधीत बावधन येथे घडला.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली असून हिंजवडी पोलिस ठाण्यात महिलेने आच्या विरोधात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचे घर बुधवारी सकाळी साडेअकरा ते साडेबारा या कालावधीत उघडे होते,याचाच गैरफायदा घेत महिला आरोपीने घरात प्रवेश करत घरातील 14 तोळे 2 ग्रॅम वजनाचे सोन्या चांदिचे दागिने व रोख रक्कम तसेच एक मोबाईल असा एकूण 7 लाख 34 हजार रुपयांचा एवज चोरून नेला होता.पोलिसांनी महिला आरोपीला बेड्या ठोकल्या असून हिंजवडी पोलीस याचा तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.