Pune : कँसर आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी सोमवारी मोफत उपचार

एमपीसी न्यूज – मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कोणत्याही प्रकारचा कर्करोग, मूत्राशयाचे आजार पंचगव्य चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे. यासाठी गोविज्ञान संशोधन संस्थेने अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय, टिळक रोड, एस.पी.काँलेजशेजारी सोमवारी (दि. 18 ते आणि 19 नोव्हेंबर) दरम्यान सकाळी 9 ते 12 या वेळेत रुग्णांना मोफत तपासणी आयोजित केली आहे.

तसेच रोगाचे निदान झालेल्या रुग्णांनी आपल्याकडे ऊपलब्ध असलेल्या पूर्वीच्या रीपोर्टसह डॉ.उदावंत यांची भेट घ्यावी. डॉक्टरांना आवश्यकता भासल्यास रूग्णांना बुधवारी (दि. 20 ते 25 नोव्हेंबर)पर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. पंचगव्य उपचार पध्दतीने व्याधीमुक्त करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये तपासणीसह एडमिशन तसेच रुग्णांचे खाणेपिणे औषधोपचार सर्वच सुविधा विनामूल्य असणार आहे. यासाठी 922243653, 9881667928, 8806493467या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन गोविज्ञान संशोधन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.