_MPC_DIR_MPU_III

Wakad : सभोवताली सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवा; सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा नागरिकांना सल्ला

एमपीसी न्यूज – सतर्क नागरिक हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने चौकस राहून सभोवताली सुरु असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला. थेरगावातील गणेशनगर येथील नागरिकांना सुरक्षितेबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी नगरसेवक सचिन भोसले, शरद कोकड, विनायक टीकोळे, नानासाहेब पाटील, विनोद खानविलकर, वैभव शेडगे, प्रशांत गायकवाड, भरत शेळके, गोपाळ भिंगारदिवे, दिलीप बोरगावे, सुनील धिवार, प्रभाकर कुलकर्णी, गणेश हुंबे, सुनील माने, आशिष भोरे, रमेश यादव, बाबू योहन्ना, संदीप शिंदे, महेश सरगर, श्रीकांत नायर आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

शहरात सगळीकडेच चोरट्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी वाकड पोलिसांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन सुरक्षितेबाबत काय खबरदारी घ्यावी?, यावर मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार रविवारी (दि. 10) काळेवाडी आणि थेरगाव परिसरात यामध्ये दरवाजाचे ‘लॉक’ कसे असावे?, सोशल मीडियाचा वापर कसा करावा?, सायबर क्राईम करणाऱ्या गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी याबाबत माहिती देण्यात आली.

सहायक निरीक्षक स्वामी म्हणाले, हिंजवडी आयटी हबमुळे थेरगाव, वाकड परिसरात परप्रांतीयांचा वावर वाढला आहे. नुकतेच एका सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे महाविद्यालयीन विद्यार्थी वाटतात. त्यामुळे भाडेकरू ठेवताना त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच, कॉलनीमध्ये वावरताना एखादा संशयित वाटल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्या, आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल.

यावेळी नागरिकांनी नगरसेवक भोसले यांच्यासमोर नागरी समस्या सांगितल्या. त्यांनी देखील नागरी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. तसेच, नागरिकनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भोसले यांनी कॉलनीच्या प्रवेशद्वारावर स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.