Pune Ganpati Visarjan : मानाच्या पाचही गणपतींचे यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होऊ शकली नाही. आज सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जनाला सुरुवात झाली असून पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन यंदा उत्सव मंडपासमोरच विसर्जन केले गेले.

याच दरम्यान तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलीस तिथे पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचं साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परवानगी नसतानाही वादन केले जात असल्याने कारवाई केल्यानंतर गोंधळ उडाला.

मात्र काही वेळाने पोलिसांनी जप्त केलेलं साहित्य परत केलं. यानंतर शांततेत मिरवणूक काढत गणपतीचं विसर्जन करण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच पुणे शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.