Pune : कसबा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावा : हेमंत रासने

एमपीसी न्यूज – कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित(Pune) विकासकामे मार्गी लावा, अशी मागणी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे.

यांसंबंधीचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांना आज देण्यात आले आहे. मतदारसंघातील रस्ते, ड्रेनेज लाईन, घनकचरा तसेच आरोग्य संदर्भातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्या संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.

Bhosari : इंद्रायणी नदी स्वच्छता व संवर्धनासाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, मतदारसंघाचे (Pune )पालक मामा देशमुख उपस्थित होते.
दरम्यान, कसबा विधानसभा मतदारसंघातील या समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिले, अशी माहिती हेमंत रासने यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.