Cricket : श्रद्धा गिरमे, लुजेन मुजावर ठरल्या सामना वीरांगना

एमपीसी न्यूज – 19 वर्षाखालील वुमेन्स व्हेरॉक कप 2023 मधील साखळी (Cricket)  सामन्यात  वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीची श्रद्धा गिरमे आणि हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमीची लुजेन मुजावर या दोन वेगवेगळ्या सामन्यांमध्ये सामना वीरांगना ठरल्या.

थेरगाव येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात 19 वर्षाखालील महिलांचे वेरॉक क्रिकेट चषक सुरु आहे. या चषकातील साखळी सामन्यात वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विरुद्ध कोहिनूर ग्रुप इलेव्हन या संघांमध्ये झालेल्या लढतीत वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीच्या संघाने विजय मिळवला आहे.

कोहिनूर ग्रुप इलेव्हन च्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने 125 धावा उभारल्या. प्रत्युत्तरात कोहिनूर ग्रुप इलेव्हनच्या संघाने 118 धावाच करू शकला. वॉरियर्स क्रिकेट अकॅडमीने7 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 39 धावांची खेळी करणारी श्रद्धा गिरमे सामना वीरांगना ठरली.

Bhosari : इंद्रायणी नदी स्वच्छता व संवर्धनासाठी भोसरी येथे ‘रिव्हर सायक्लोथॉन’

क्रिकेट डिफेन्स अकॅडमी  आणि हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमी या संघांच्या दरम्यान खेळवल्या गेलेल्या सामन्यात हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमीची लुजेन मुजावर सामना वीरांगना ठरली.

क्रिकेट डिफेन्स अकॅडमी ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 82 धावांचे लक्ष्य हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमी समोर ठेवले. हे लक्ष्य हेमंत पाटील क्रिकेट अकॅडमीने लुजेन मुजावर नाबाद 46 आणि सामिका कौशल नाबाद 26 यांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 15.5 षटकांत सहज गाठले. या सामन्यात लुजेन मुजावर सामना वीरांगना (Cricket)  ठरली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.