Pune : युती व्हावी ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा – पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज- आगामी निवडणूक लक्षात घेता भाजप आणि सेनेची युती व्हावी, ही दोन्ही पक्षातील कार्यकर्त्याची इच्छा आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात एका कार्यक्रमात नंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. आम्ही दोघेही भाऊ असून भाऊ ही संकल्पना गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची चर्चा आहे. त्यावर सोशल मीडियावर युती विषयी चर्चा मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून तर अनेकजण त्यावर मत देखील व्यक्त करीत आहेत.

शिवसेना आणि भाजपच्याच्या युती बाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी संवाद साधला असता. ते म्हणाले की, शिवसेना आणि भाजपचे दोन्ही नेते समजूतदार आहेत. ते भविष्याचा वेध घेऊन लवकरच युतीबाबत निर्णय जाहीर करतील. तसेच जागा वाटपामध्ये कोण कुठून उभा राहणार यावरून काही वाद पक्षांतर्गत असतात. त्या बाबत देखील निर्णय होईल. असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.