Pune : सतत मोबाईलमध्ये गुंतलेल्या पत्नीवर पतीचा जीवघेणा हल्ला; पतीला अटक

एमपीसी न्यूज – सॅलसबरी पार्क येथे कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

नर्गीस आसिफ नायब (वय ४२, रा. सॅलसबरी पार्क, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती असिफ सत्तार नायब (वय ४०, मेहर क्लासिक, मार्केटयार्ड) याला पोलीसांनी अटक केली आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ आणि त्याची पत्नी हे सॅलबरी पार्क येथे राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्यात काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते. सोमवारी आरोपी आसिफ याने वादानंतर पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या इमारतीमध्ये त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांनी तत्काळ नर्गीस यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पत्नी सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असते, या कारणावरून पटीने कोयत्याने वार केले आहेत, असे कारण समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यात पत्नीच्या उजव्या हाताचा अंगठा तुटला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.