Pimpri: शकुंतला गव्हाणे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील जोग महाराज महिला भजनी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा आदर्श माता शकुंतला ज्ञानोबा गव्हाणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक तसेच धार्मिक कार्यात सहभाग असायचा.

  • पीएमपीएलचे निगडी आगारव्यवस्थापक आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कामगार सहकारी पतसंस्थेचे संचालक सतीश महाराज गव्हाणे, कामगार नेते संदीप गव्हाणे यांच्या त्या मातोश्री होत. तर निवृत्त प्रशासन अधिकारी ज्ञानोबा गव्हाणे यांच्या पत्नी होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.