Pune : पत्नीला पेटवून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

एमपीसी न्यूज- पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून चिडून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी हा आदेश दिला.

अनिल भगवान म्हस्के (वय 38 रा. विश्रांतवाडी) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लक्ष्मी अनिल म्हस्के ( वय 35) यांनी फिर्याद दिली होती. ही घटना 25 मार्च 2013 रोजी घडली. आरोपी अनिल म्हस्के याने पत्नी लक्ष्मीकडे पैसे मागितले होते. मात्र तिने पैसे दिले नाहीत. म्हणून रागाच्या भरामध्ये तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना लक्ष्मी यांचा दुसऱ्या दिवशी 26 मार्च 2013 रोजी मृत्यू झाला होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.