Pune : वॉर्डस्तरीय कार्यकर्ता ते महापौर झाल्याचा मला आनंद -नवनियुक्त महापौर मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज – वॉर्डस्तरीय कार्यकर्ता ते महापौर ही माझ्या पक्षाने दिलेल्या संधीचा मला आनंद आहे. आगामी काळात पुणे शहराचा विकास करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे नवनियुक्त महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

तसेच मेट्रो, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय, असे अनेक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आमचा जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. निवडीनंतर मोहोळ प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.