Pune: पश्चिम आशियातील धोरणात भारताने दक्षता बाळगणे आवश्यक – डॉ. अभ्यंकर

एमपीसी न्यूज – ‘भारताचे पश्चिम आशियाशी ऐतिहासिक संबंध (Pune)आहेत. या भागातील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार आधी देशांतून भारत आजही तेल व नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणावर आयात करतो.

सुमारी 88 लाख अनिवासी भारतीय या देशांमध्ये राहून सुमारे चार हजार कोटींची परकीय गंगाजळी भारतात पाठवत असतात. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन इस्राइल व हमास संघर्षाच्या काळात भारताला अतिशय दक्षतेने परराष्ट्र धोरण आखावे लागत आहे’, असे प्रतिपादन भारताचे माजी राजदूत डॉ. राजेंद्र अभ्यंकर यांनी नुकतेच केले.

 

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी परिसरात होणार ‘महादुर्ग’ महोत्सव

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग (Pune)आणि कुंझरू सेंटर फॉर डिफेन्स स्टडीज अँड रिसर्च सेंटर यांनी डॉ. अभ्यंकर यांचे ‘भारतासमोरील पश्चिम आशियातील आव्हाने: राष्ट्रीय हित आणि बलाचे संतुलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर होते. या वेळी विभागप्रमुख डॉ. संजय तांबट, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे आदी व्यासपीठावर होते.

डॉ. अभ्यंकर यांनी पश्चिम आशिया व युरोपीय देशांबरोबरच अमेरिकेतही भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताने ते म्हणाले की, ‘भारताची ऊर्जेची गरज, अनिवासी भारतीयांची सुरक्षा, पश्चिम आशियातील देशांमधील अंतर्गत भांडणे लक्षात घेऊन राष्ट्रीय हितांची जपणूक करणारे धोरण आखावे लागते.

भारताने1990च्या दशकात इस्राईलशी राजनयिक संबंध प्रस्थापित केले. आता सामरिक क्षेत्रातील भागीदार म्हणून द्विपक्षीय संबंध विकसित होत आहेत. मात्र, त्यापूर्वी भारताने पॅलेस्टिनी जनतेच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे हमास-इस्राइल संघर्षात भारताला जपून पावले टाकावी लागत आहेत.’

‘भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे सदस्यत्व नकाराधिकारासह (व्हेटो) मिळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. तसे झाले, तर भारताला पश्चिम आशिया आणि जगातील इतर ठिकाणच्या संघर्षांमध्ये स्पष्ट व निर्णायक भूमिका घेणे भाग पडेल’, असे मतही त्यांनी व्यक्त केले. डॉ. सोनल जुवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. संदीप नरडेले यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.