Jejuri : प्रभू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळा श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने उत्साहामध्ये साजरा

एमपीसी न्यूज – अयोध्या प्रभू श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा (Jejuri)व मंदिर लोकार्पण सोहळा श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.

या अभूतपूर्व क्षणाच्या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये एक चैतन्यमय ऊर्जामुळे वातावरण असतानाच मार्तंडदेव संस्थांच्या वतीने विश्वस्तांनी जेजुरीतील सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय घेतला.

याबरोबरच देवस्थानच्या वतीने पूर्वसंध्येला म्हणजे 21 तारखेला(Pune) श्री खंडोबा मंदिरामध्ये भव्य दीपोत्सव साजरा झाला. 22 तारखेला पहाटे सह धर्मदाय आयुक्त सुधीर कुमार बुके यांच्या व परिवाराच्या तसेच ग्रामस्थांच्या हस्ते प्रभू रामचंद्र व श्री खंडेरायाची विशेष भूपाळी पूजा अभिषेक यानंतर महाआरती संपन्न झाली.

Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त शिवनेरी परिसरात होणार ‘महादुर्ग’ महोत्सव

येणाऱ्या मंदिरावरील प्रत्येक भाविकांसाठी बुंदीचा प्रसाद, त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजून 29 मिनिटानंतर प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. मंदिरामध्ये ठिकठिकाणी रांगोळ्या पायघड्या सजवण्यात आल्या. यासोबतच देवस्थानच्या वतीने काहीच विशेष संस्थांच्या सहकार्याने रामरक्षा पठण, राम रक्षावर कथक नृत्य, काही विशेष यज्ञाचे आयोजनही करण्यात आले.

यावेळी सर्व विश्वस्त मंडळ ग्रामस्थ खांदेकरी मानकरी यांनी या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त भाग घेऊन वातावरण चैतन्यमय केले, अशी माहिती अयोध्या कारसेवक तथा विश्वस्त, श्री मार्तंड देवस्थान, जेजुरीचे डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर यांनी दिली.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.