Pune: आयपीएचतर्फे उद्या संध्याकाळी व्यसनमुक्तांच्या कुटुंबियांचा स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे व्यसनमुक्तांच्या कुटुंबियांचा स्वमदत गट (सहजीवन सभा) दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. मात्र आज, सोमवारी गौरी विसर्जन असल्यामुळे या महिन्याची सहजीवन सभा उद्या मंगळवारी (दि. 18) संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. अशी माहिती आय पी एच तर्फे देण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आय. पी. एच. पुणे व मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने कर्वेनगर येथील इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ येथे व्यसनमुक्तांच्या कुटुंबियांचा स्वमदत गट (सहजीवन सभा) जमतो. मात्र या महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजे आज गौरी विसर्जन असल्यामुळे या महिन्याची सहजीवन सभा उद्या मंगळवारी (दि. 18) संध्याकाळी होणार आहे. या वेळेचा चर्चेचा विषय आहे ‘ठामपणा’.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

हा स्वमदत गट पूर्णपणे विनामूल्य असून अधिक माहितीसाठी प्रसाद ढवळे 9423209443, प्रफुल्ला मोहिते 9822669204, मानव जोगदेव 7719013040 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.