Pune : कलापिनी कुमार भवनचे आठव्या वर्षात पदार्पण; सातवा वर्धापन दिन दिमाखात संपन्न

एमपीसी न्यूज : जुन्या..नव्याचा मेळ (Pune ) घालून कै. पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प गुरुवंदना व कलापिनी कुमार भवनाचा सातवा वर्धापन दिन गेल्या रविवारी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रो.प्रकाश जकातदार, डॉ. अनंत परांजपे, अंजली सहस्रबुद्धे, संपदा थिटे आणि संदीप मनवरे ह्यांच्या हस्ते नटराज पूजनाने झाली.

कुमार भवनच्या मुलांनी सुंदर श्लोक सदर करून वातावरण सूरमयी केलं. गेली 7 वर्षे कलापिनी ‌तर्फे कुमारवयीन मुला – मुलींसाठी दर रविवारी कुमार भवन घेतले जाते.

मुलांना विविध कलांची ओळख व्हावी आणि त्यांची आवड आणि सुप्त गुण ओळखून त्यात त्यांना पुढे प्रगती करता यावी हाच उद्देश्य कुमार भवन चालू करण्या मागचा आहे असे आपल्या प्रास्ताविकात डॉ.अनंत परांजपे यांनी सांगितले. ह्या नंतर कुमार भवनच्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर झाला.

कार्यक्रमाची सुरवात सुंदर अशा देवा तुझे किती सुंदर आकाश ह्या प्रार्थनेने झाली. ह्यानंतर आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी मुलांनी गुरु स्तोत्रतील श्लोक म्हटले. त्यानंतर प्राची गुप्ते ह्यांनी गुरूने दिला ज्ञानरुपी वसा हे गाणं म्हटले आणि सर्वांनी त्यांना साथ दिली .

सर्व श्लोक आणि (Pune) गाणी ह्यासाठी मार्गदर्शन संपदा थिटे ह्यांनी केले. तबल्यावर होते चैतन्य लोवलेकर. सर्व मुलांनी मग नृत्यातील आपली चुणूक दाखवली. विपुल परदेशी ह्यांनी बसवलेल एक सुंदर देशभक्तीपर नृत्य मुलांनी सादर केलं आणि वाहवा मिळवली.

Mumbai : सलग चार वेळा ‘मिस्टर इंडिया’ विजेते आशिष साखरकर यांचे निधन

ह्यानंतर 3  नाटकांचे मुहूर्त करण्यात आले. त्यावेळी विनया केसकर, सागर यादव आणि प्रियंका हांडे यांनी त्या नाटकांची माहिती दिली.

कजा कजा मरू चला …मजा मजा करू चला …ही एक विनोदी पण तितकीच अवघड कविता मुलांनी सादर केली .ह्यात शब्दांची अदलाबदल करून पुन्हा बरोबर ओळ म्हणण्याची गंमत होती ..सर्व प्रेक्षकांनी ही कविता खूप एन्जॉय केली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रोफेसर प्रकाश जकातदार आणि श्रीमती वैजयंती दाते हे उपस्थित होते. जकातदार सर हे प्रेरक व्याख्याते म्हणून नावाजलेले आहेत. गेली 35 वर्ष ते IIT च्या मुलांना कोचिंग देत आहेत. ‘ स्फूर्ती’ ह्या नवाने त्यांनी मुलांना प्रेरित करण्यासाठी 200 वर्कशॉप्स घेतली आहेत. भविष्यात, ते कलापिनीत पण व्याख्यानासाठी मुलांसाठी नक्की येईन असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले

दोन्ही पाहुण्यांनी कुमार भवनची खूप स्तुती केली आणि सर्वांशी संवाद साधला. अभ्यासाबरोबर अंगी कलागुण असणे खूप आवश्यक आहे आणि ते वाढविण्यासाठी खूप मेहनत आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष विनायक अभ्यंकर ह्यांनी पण सर्व मुलांना शुभेछा दिल्या. कै.पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प “गुरुवंदना” हा गुणवंत विद्यार्थी कौतुक समारंभ दर वर्षी आपण घेत असतो. ह्या वर्षी बाल भवन आणि कुमार भवन मध्ये येऊन गेलेली आणि आता दहावी आणि बारावी उत्तम रित्या उत्तीर्ण झालेली व पुढचे शिक्षण उत्तमरित्या घेत आहेत अशा मुलांचा छोटीशी भेटवस्तू देऊन सत्कार केला गेला. या सर्व मुलांच्या वतीने शौनक देशमुख याने मनोगत व्यक्त केले.

सर्व मुलांना पुनर्भेट झाल्याने खूप आनंद झाला आणि जुन्या आठवणींची उजळणी झाली. कुमार भवन मधील निमिष सुर्वे याने कुमार भवन मध्ये विविध गोष्टी शिकायला मिळतात असे मनोगत व्यक्त केले.

पालक वर्गातून अश्विनी शेवाळे ह्यांनी कुमार भावनामुळे त्यांच्या मुलाचा चांगला विकास कसा होत आहे असे आपल्या मनोगतात सांगितले.

त्यानंतर अंजली सहस्त्रबुद्धे ह्यांनी कुमार भवन च्या प्रशिक्षिकांचे कौतुक करून त्यांचे येथील योगदान निदर्शनास आणून दिले. मान्यवरांच्या हस्ते ह्या सर्वांचा सत्कार करण्यात आला .

कार्यक्रमाच्या शेवटी दोन वेगळ्या विषयांवरची नाटके मुलांनी सादर केली. योगेश वैद्य ह्यांनी दिग्दर्शित केलेले महाराजांचा मुगुट आणि अभिलाष भावर ह्यांनी दिग्दर्शित केलेले भूत बांगला ह्या दोन्हीं नाटकांना खूप टाळ्या मिळाल्या.

या सुंदर कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लीना परगी ह्यांनी केले .तांत्रिक बाजू शार्दुल गद्रे, अभिलाष भवार ह्यांनी सांभाळली. कलापिनी च्या सर्व कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.