Mumbai : सलग चार वेळा ‘मिस्टर इंडिया’ विजेते आशिष साखरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध बॉडी-बिल्डर, चार वेळा ‘मिस्टर इंडिया’ विजेते (Mumbai) आणि ‘मिस्टर युनिव्हर्स’ रौप्य आणि कांस्यपदक विजेते  आशिष साखरकर यांचे मंगळवारी (दि. 18) रात्री उशिरा प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

भारतीय बॉडी-बिल्डिंग फेडरेशनच्या सचिव हिराल यांनी माध्यमांना सांगितले, की साखरकारांना आरोग्य त्रास होत होता आणि त्यांना एका आठवड्यापूर्वी दक्षिण मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉडी-बिल्डिंग क्षेत्राच्या 80 किलो वर्गामध्ये आशिष साखरकर यांनी बऱ्याच मोठ्या कामगिरी केल्या आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व एक मुलगा आहे.

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे

देशाला कीर्ती मिळवून देणारे साखरकर यांच्या निधनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक (Mumbai ) व्यक्त केला असून त्यांच्या जाण्याने बाकी बॉडी बिल्डर बांधवांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

त्यांचे अनेक चाहते त्यांना त्यांच्या इंस्टाग्रामवरील शेवटच्या पोस्टवर भावपूर्ण श्रद्धांजली देत आहेत. प्रत्येक महत्त्वाकांक्षी बॉडी बिल्डर जे साखरकारांना स्वतःचे गुरु मानायचे त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.