Pune:मध्य प्रदेशची विजयी सुरुवात; हॉकी बंगालचे गुजरातवर 28 गोल

हॉकी इंडिया सीनियर महिलांची राष्ट्रीय स्पर्धा; झारखंड, कर्नाटकचीही विजयी सलामी

एमपीसी न्यूज – गतविजेता हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीवर 8-0 अशी मात करताना 14व्या हॉकी(Pune) इंडिया सीनियर महिलांची राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सुरुवात केली आणि स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. हॉकी बंगालने गुजरातचा 28-0 असा धुव्वा उडवला. झारखंड, कर्नाटकनेही विजयी सलामी दिली. 
नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू झालेल्या स्पर्धेत हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशला 13-0 असे हरवले. तामिळनाडूने तेलंगण हॉकीवर 2-0 अशी मात केली. हॉकी कर्नाटकने हॉकी उत्तराखंडला 6-0 असे रोखले.

 

YCMH : कर्मचारी महासंघाचे वायसीएममधील मेडिकल पुन्हा सुरू

पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यात ए गटातील हॉकी मध्य प्रदेशने हृतिका सिंगच्या चार गोलच्या छत्तीसगड हॉकीला 8-0 असे पराभूत केले. हृतिकाने 11व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये रुपांतर करून गोलखाते उघडले. त्यानंतर 17व्या, 22व्या आणि 33व्या मिनिटाला गोल करताना गोलचौकार पूर्ण केला. मध्यंतराला 4-0 अशी आघाडी घेणार्‍या हॉकी मध्य प्रदेशने उत्तरार्धात आणखी तितक्याच गोलांची भर घातली. प्रीती दुबे (24व्या मिनिटाला), ऐश्वर्या चव्हाण (46व्या मिनिटाला), अंजली गौतम (48व्या मिनिटाला) आणि साधना सेंगरने (57व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करताना विजयाला हातभार लावला.
सी गटात हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशवर 13-0 असा सहज विजय मिळवला. त्यात आठ खेळाडूंच्या गोलचा समावेश आहे.  संगीता कुमारीचे (24, 54, 57 आणि 60व्या मिनिटाला) सर्वाधिक चार गोल आहेत. महिमा टेटेने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला.  त्यानंतर, दीपिका सोरेंग (18 आणि 35व्या मिनिटाला), दीप्ती टोप्पो (24व्या मिनिटाला,  32 व्या मिनिटाला) तसेच सलीमा टेटे (25व्या), रजनी केरकेट्टा (35व्या मिनिटाला), दिप्ती कुल्लू (38व्या मिनिटाला) आणि निक्की कुल्लू (39व्या मिनिटाला) यांचा समावेश आहे.
तिसरा सामना एकतर्फी झाला. एच गटात हॉकी बंगालने हॉकी गुजरातचा 28-0 असा धुव्वा उडवताना दिवसातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.होरो संजनाने (12, 20, 34, 47, 47, 53, 54, 54 मिनिटाला) तब्बल आठ गोल करताना त्यात सर्वाधिक वाटा उचलला.  सुष्मिता पन्ना हिने (13, 21, 36, 55, 57व्या मिनिटाला) पाच आणि मॅक्सिमा टोप्पो हिने (24, 28, 44 आणि 58व्या मिनिटाला) चार गोल करताना तिला सुरेख साथ दिली. मोनिका नाग हिने (7 आणि 15व्या मिनिटाला) पहिला गोल केला.  सुश्मिता गंधाने (23 आणि 55व्या मिनिटाला), लिली ओरम (32, 32 आणि 45व्या मिनिटाला), कविता (40 आणि 59व्या),  निधी साहनी (41व्या मिनिटाला) आणि अंजना डुंगडुंग (49व्या मिनिटाला) यांनीही विजयाला हातभार लावला.
एच गटातील सामन्यात, तामिळनाडू हॉकी युनिटला तेलंगण हॉकीने 2-1 असे झुंजवलेे. सोनिया एस हिने 23व्या मिनिटाला पहिला गोल केला. तेलंगणकडूनवर्शिथा मुप्पाला (39व्या) हिने बरोबरी साधून दिली. मात्र, सोनियाने 51व्या मिनिटाला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करताना तामिळनाडूला जिंकून दिले.

निकाल –
ए गट: हॉकी मध्य प्रदेश: 8(हृतिका सिंग 11व्या मिनिटाला पीसी.; 17व्या, 22, 33व्या; प्रीती दुबे 24व्या, ऐश्वर्या चव्हाण 46व्या; अंजली गौतम 48व्या पी.सी. साधना सेंगर 57व्या मिनिटाला) विजयी वि. छत्तीसगड हॉकी 0: हाफटाईम: 4-0

 

क गट: हॉकी झारखंड: 13 (महिमा टेटे चौथ्या मिनिटाला, पीसी; दीपिका सोरेंग 18, 35व्या मिनिटाला; दिप्ती टोप्पो 24व्या मिनिटाला पीसी., 32 पीएस; संगीता कुमारी 24व्या, 54व्या, 57व्या, 60व्या मिनिटाला; सलीमा टेटे 25व्या, रजनी केरकेट्टा 35व्या मिनिटाला पीसी, दिप्ती कुल्लू 38व्या मिनिटाला; निक्की कुल्लू 39व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी आंध्र प्रदेश 0: हाफटाईम: 5-0

 

 

 

 

एच गट : हॉकी बंगाल: 28 (मोनिका नाग 7व्या, 15व्या; होरो संजना 12, 20, 34, 47, 47, 53, 54, 54व्या मिनिटाला; सुष्मिता पन्ना 13, 21, 36, 55, 57व्या व्या मिनिटाला; सुष्मिता गांधा 23 आणि 55व्या मिनिटाला पीसी; मॅक्सिमा टोप्पो 24व्या मिनिटाला पीसी, 28, 44, 58व्या मिनिटाला; लिली ओरम 32, 32, 45व्या मिनिटाला; कविता 40व्या मिनिटाला पीसी आणि 59व्या मिनिटाला; निधी साहनी 41व्या मिनिटाला; अंजना डुंगडुंग 49व्या मिनिटाला पीसी) विजयी वि. गुजरात 0: हाफटाईम 9-0.
एच गट: हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू: 2 (सोनिया एस 23व्या, 51व्या मिनिटाला) विजयी वि. तेलंगणा हॉकी: 1 (वर्षिथा मुप्पाला 39व्या मिनिटाला). हाफटाईम: 1-0
जी गट : हॉकी कर्नाटक: 6 (कृतिका एसपी सातव्या मिनिटाला, 34व्या मिनिटाला पीसी, एमजी याशिका आठव्या, बीएन पुजिता 22व्या मिनिटाला; चंदना 23व्या मिनिटाला, अंजली एचआर 48व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी उत्तराखंड: 0. हाफटाईम: 4-0.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.