Pune News : लोकजीवनातील भीती गांधी मार्गाने दूर करण्याची गरज : अरुण खोरे

एमपीसी न्यूज लोकजिवनातील भीती गांधींना समजून घेत त्यांच्या मार्गाने दुर कऱण्याची सध्या गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व गांधीविचारांचे अभ्यासक (Pune News) अरूण खोरे यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित व्याख्यानात बोलत होते.

हा कार्यक्रम आज (सोमवारी) कोथरूड येथील गांधी भवन येथे बोलत होते. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ‘ या संस्थेकडून कडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी लिखित ‘धर्मविचार भाग-1 आणि धर्मविचार भाग-2’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले.

यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी,डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी,महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड , आदित्य आरेकर , श्रीकृष्ण बराटे आदी उपस्थित होते.

Pune News : महाराष्ट्राच्या श्रध्दास्थानांवर शिंतोडे उडवणाऱ्यांना राजाश्रय मिळतोय – गोपाळदादा तिवारी

अरुण खोरे म्हणाले, ‘गांधी विचार संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र आणि उत्तर भारतात हा प्रयत्न अधिक होत आहे. त्याला उत्तर दिले पाहिजे.जगभर अनेक विद्यापिठात (Pune News) गांधीजींच्या विचारांचा अभ्यास सुरू आहे.  स्वातंत्र्यानंतर लोकसेवक संघ सुरू करा असे गांधीजींनी सांगितले याचा अर्थ काँग्रेसने राजकारण सोडावे, पोकळी निर्माण करावी, असा त्याचा अर्थ होत नाही.

‘गांधीजींना बदनाम करण्याची कट कारस्थाने सुरू आहेत. गांधीजी, नेहरूजी  हिंदू होते, की मुसलमान हे महत्वाचे नाही, ते श्रेष्ठ भारतीय, श्रेष्ठ मानव आहेत, हे महत्वाचे आहेत. गांधीजींना मोठया प्रमाणात स्वीकारले गेले आहे. हा विचारांचा ठसा अमीट आहे. हा वारसा पुढे नेला पाहिजे.

काँग्रेसची जबाबदारी त्यासंदर्भात अधिक आहे.कॉंग्रेसने निष्प्रभ  होऊन चालणार नाही. गांधी मार्गाने आपल्याला जाता आले नाही, म्हणून आपण गांधीजींची क्षमा मागितली पाहिजे.(Pune News) गांधीजींनी लोकांच्या मनातील भीती दूर केली. आता पुन्हा लोकजीवनात भीती दाटून आली आहे.

महाशक्ती ला सगळे घाबरत आहे. ही भीती दूर करण्याची गरज आहे. गांधीजींनी विचार, कृतीचे दान आपल्या झोळीत टाकले आहे, पण आपली झोळी फाटकी आहे, आपण हा वारसा समर्थपणे पुढे नेऊ शकत नाही.तो पुढे नेला पाहिजे, असे मत खोरे यांनी व्यक्त केले. यावेळी अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.