Pune : पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा संबंध नाही

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रो सेवामधील व्यत्ययांसाठी ( Pune) वीजपुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महावितरणला जबाबदार ठरविण्यात येत आहे. तथापि, मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी महावितरणचा कोणताही संबंध नाही. असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Express Way : सोमवारी एक तास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर ब्लॉक

शुक्रवारी (दि. 13) सकाळी साडे अकराच्या सुमारास वनाज ते रूबी हॉल ( Pune) मार्गावरील सेवा 21 मिनिटे बंद पडली होती. मात्र विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे यंत्रणेवरील भार (LOAD) वाढल्याने महावितरणकडून वीजपुरवठा अचानक बंद झाल्याचा दावा मेट्रोकडून करण्यात आला आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, महावितरणचा पुणे मेट्रोच्या वीजपुरवठ्याशी कोणताही संबंध नाही, असा खुलासा महावितरणकडून करण्यात आला आहे.

पुणे महामेट्रोला महावितरणकडून (MSEDCL) नव्हे, तर महापारेषण (MSETCL) कंपनीकडून 132 केव्ही दाबाचा वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे महामेट्रो मधील वीजपुरवठ्याशी निगडीत कोणत्याही व्यत्ययासाठी महावितरण जबाबदार नसल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले ( Pune)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.