Pune News : पुण्यातील मासिक पाळी प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

एमपीसी न्यूज : महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. (Pune News)  या घटनेनंतर आता राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली असून आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी जागतिक महिला दिवस साजरा केला. मात्र, पुण्यातील घटना बघता अजूनही महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सुरू असलेला लढा आणखी किती दिवस लढावा लागेल, हा प्रश्न पडतो, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.

Vadgaon Maval : पीडीसीसी बँक सेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत मावळ गटातून चंद्रकांत ढोरे विजयी

तसेच पुण्यातील या घटनेबाबत महिला आयोग पाठपुरावा करेन आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्या म्हणाल्या. याबरोबरच समाजात अशा प्रकारे घटना घडू नये,(Pune News) यासाठी सातत्याने अनिस आणि इतर संघटनांच्या मदतीने महिला आयोगाकडून जनगागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.