Vadgaon Maval : पीडीसीसी बँक सेवक पतसंस्थेच्या निवडणुकीत मावळ गटातून चंद्रकांत ढोरे विजयी

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवकांची (Vadgaon Maval) सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मावळ तालुका गटातून वडगाव मावळ येथील चंद्रकांत ढोरे यांचा 82 मतांनी विजय झाला.

पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली, या निवडणुकीत सहकार परिवर्तन पॅनल व स्वामी समर्थ सहकार पॅनल मध्ये लढत झाली. (Vadgaon Maval) मावळ गटातून सहकार परिवर्तनचे उमेदवार म्हणून चंद्रकांत ढोरे तर स्वामी समर्थ पॅनेलचे उमेदवार म्हणून गुलाबराव खांदवे यांच्यात सरळ लढत झाली.

Pimpri News : डी. वाय. पाटील महाविद्यालयात RYLA चा कार्यक्रम संपन्न

या निवडणुकीत ढोरे यांना 432 तर खांदवे यांना 350 मते मिळाली, त्यामुळे ढोरे हे 82 मतांनी विजयी झाले. नवनिर्वाचित संचालक चंद्रकांत ढोरे हे जिल्हा बँकेच्या वडगाव मावळ शाखेत सेवेत असून श्री पोटोबा महाराज देवस्थानचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत.

आमदार सुनील शेळके, श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, जेष्ठ नेते व मावळ भाजपाचे प्रभारी भास्कर (Vadgaon Maval) (आप्पा) म्हाळसकर, उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, माजी सरपंच पंढरीनाथ ढोरे आदींच्या हस्ते ढोरे यांचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.