Pimpri News : डी. वाय. पाटील महाविद्यालयात RYLA चा कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज : रोटरी युथ लीडरशिप अवॉर्डस हा कार्यक्रम  4 मार्च रोजी डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पिंपरी येथे झाला. (Pimpri News) महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांनी हा कार्यक्रम एकत्रितरित्या आयोजित केला. डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयात महिला सक्षमीकरण आठवडा साजरा करण्यात आला होता, त्या अंतर्गत हा कार्यक्रम झाला.

रो. दिवाकरन पिल्ले यांनी व्यक्तिमत्व विकास, रो. संतोष गिरांजे यांनी मानसिक जडत्व आणि डॉ. दीपक शिकारपूर याने करिअर 2023+ या विषयावर मार्गदर्शन केले. रो. विन्सेंट (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन), सुशील अरोरा (विश्वस्त, रोटरी क्लब पिंपरी टाऊन) सारंग माताडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Nigdi News : लागवड केलेल्या रोपांची निगा राखावी –  अश्विनी जगताप

प्रा. अलकनंदा माताडे यांनी कार्यक्रमाचे समन्वयक आणि सूत्र संचालक म्हणून काम केले. प्राचार्य डॉ. सुरेश धरणे यांनी प्रास्ताविक केले. (Pimpri News) या कार्यक्रमास प्रा. मेघना खरात, प्रा. ज्योती विश्वकर्मा यांनी सहकार्य केले.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाला तमाम विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. कार्यक्रमांमध्ये मुलींना करिअरच्या योग्य दिशा दाखवत अतिशय रंजकपणे मार्गदर्शन करून डॉ. दीपक शिकारपूर यांनी सक्षम होण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री पाटील व विश्वस्त डॉ. सोमनाथ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.