Dapoli resort scam : दापोली रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

एमपीसी न्यूज : दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. सदानंद कदम यांची ईडी कार्यालयात जवळपास (Dapoli resort scam) 4 तासांपासून चौकशी सुरु होती. उद्योजक सदानंद कदम हे रामदास कदम यांचे लहान बंधू आहे. आज त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे.

दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडी सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली.  दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज सर्च ऑपरेशन साठी गेलं होत. त्यानंतरब कदम यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी  कार्यालयात बोलावण्यात आले होते. चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे.

Pune News : पुण्यातील मासिक पाळी प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

सदानंद कदम यांनी अनिल परब यांच्याकडून (Dapoli resort scam) साई रिसॉर्टची जमीन 2020 ला विकत घेतली. याच व्यवहारात अफरातफर झाल्याचा इडीचा आरोप आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.