Pune Metro News: ‘बुधवार पेठ’, ‘भोसरी’ या मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याची मागणी

एमपीसी न्यूज – महा मेट्रोचं महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठ मेट्रो स्थानक व भोसरी मेट्रो स्थानक या दोन नावाला पुणेकरांनी आक्षेप घेतला आहे. या दोन स्थानकाची नावे बदलण्यात यावी अशी मागणी केली जाते. 

पाच वर्षानंतर पुणे शहरातील मेट्रो अखेर सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन झालं. पुणेकरांनी ही मेट्रोचा या सेवेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत लाखो प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केलाय. मेट्रो प्रकल्पाचे काम हे जोरात सुरू आहे. मात्र असं असलं तरीही पुणे मेट्रोने स्थानकांना दिलेल्या काही नावाचा विरोध केला जातोय.

पुण्यातील बुधवार पेठ मेट्रो स्थानक व पिंपरीतील भोसरी मेट्रो स्थानक या दोन नावावरून नागरिकांचा गोंधळ उडत आहे. नावाप्रमाणेच शहरातील मेट्रो ली या परिसरात थांबणार आहे. पुणे शहरातील बुधवार पेठ हा परिसर देहविक्री करणाऱ्या महिलांसाठीही म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पुणेकरांनी या नावाला विरोध दर्शवला आहे.

दुसरीकडे मेट्रो स्थानकाच्या भोसरी स्टेशन पासून भोसरी जवळपास दहा किलोमीटर लांब आहे. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे. परंतु नवीन माणसांना स्टेशनच्या या नावावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही दोन नावे बदलण्यात यावी अशी मागणी केली जाते.

खरंतर मेट्रो स्थानकाला नाव देत असतानाच मेट्रो प्रशासन आणि स्थानिक महापालिका प्रशासनाने योग्य ती काळजी घेणं गरजेचं होतं. मेट्रो स्थानकांना नाव देत असताना सर्वसामान्य नागरिकांची पंचाईत तर होत नाही ना हे पाहणं गरजेचं होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे आता या दोन स्थानकांची नावे बदलण्यात यावी, अशी मागणी केली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.