Pune : मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी महाराजनगर करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील (Pune) वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दुसर्‍या टप्प्यातील मेट्रो प्रकल्पाचे 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.

फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान येणार्‍या मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर मेट्रो हे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा यातून एकेरी उल्लेख होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्रित येऊन शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशन बाहेर छत्रपती शिवाजी महाराजनगर मेट्रो स्टेशन हे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

Talegaon Dabhade : आदर्श विद्या मंदिरात ऑग्निबेने कंपनीकडून मिळालेल्या सुविधांचे हस्तांतरण

यावेळी वैभव दिघे म्हणाले की, पुणे शहरात नागरिकाच्या सेवेसाठी मेट्रो धावणार आहे. याबद्दल आम्हाला आनंद आहे. त्याचाच दुसर्‍या टप्प्यातील फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान येणार्‍या मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असे नाव देण्यात आले आहे.

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Pune) यांचा हा एकेरी उल्लेख आहे. त्या गोष्टीचा राज्य सरकार, महापालिका आणि मेट्रो प्रशासनाचा आम्ही निषेध व्यक्त करतो. पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक या सर्व नेत्यांची नाव आपण अंत्यत आदरयुक्त घेत असतो.

पण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा उल्लेख एकेरी आम्ही खपवून घेणार नसून जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजनगर मेट्रो स्टेशन हे नाव देण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.