Pune : कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने कोंढवा परिसरातील तब्बल 33366.26 चौ.फुट क्षेत्रफळावर (Pune) कारवाई करत अनधिकृत बांधकामे हटवली आहेत. यामध्ये झोन क्र. 2 मधील मौजे कोंढवा खुर्द स.नं. 51-52, वडगाव बु. स.नं 41 आणि झोन क्र.4 मधील घोरपडी स.नं. 49 व इतर येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामाचा समावेश होता.

Pune : नाटक प्रगल्भ झाले तर नियम आडकाठी ठरत नाहीत -विद्यानिधी वनारसे

बांधकामे पाडण्याबरोबरच अनधिकृत बांधकाम धरकांना नोटीस देखील महापालिकेने बजावली आहे.या कारवाईमध्ये कोंढवा खुर्द स.नं.52 येथील मालक व इतर यांचे 2 हजार 400 चौ. फुट, युसुफ शेख व इतर यांचे 1 हजार 800 चौ. फुट, स.नं. 51 मधील परवेझ व इतर यांचे 1 हजार 200 चौ. फुट असे एकूण 5 हजार 400चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.

Pune : गणरायाच्या आगमनाला लागणार पावसाची हजेरी, राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे

तसेच वडगाव बु.स.नं41 येथील केरबा चव्हाण व इतर यांचे एकूण 19746  चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.घोरपडी स.नं.49 येथील विनोद यादव व इतर यांचे 80.73 चौ. फुट, रोहित कदम व इतर यांचे 80.73 चौ. फुट, प्रिया सोमाणी व इतर यांचे 80.73 चौ. फुट, A-1 Fatech Chicken सेंटर व इतर यांचे 80.73 चौ. फुट, जय मल्हार व इतर यांचे 80.73 चौ. फुट, अमीर चिकन व इतर यांचे 80.73 चौ. फुट इ.अनधिकृत बांधकाम स्वत:हून काढून घेतले आणि स.नं. 54 मधील रघुनाथ दळवी व इतर यांचे 4520.88 चौ. फुट, स.नं.53 मधील श्रीकांत लक्ष्मीशेठ व इतर यांचे 1600 चौ. फुट, स.नं. 73 मधील अंजली सुर्यकांत कवडे यांचे 1615 चौ. फुट इ.अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात आली असून एकूण 82.2026 चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.

ही कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी, ब्रेकर, गॅस कटर इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण (Pune) करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.