Pune : वाढत्या बेरोजगारी विरोधात राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज- भाजप सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरले असून त्याच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

यावेळी चेतन तुपे म्हणाले की, भाजप सरकारने सत्तेमध्ये येण्यापूर्वी अनेक आश्वासन दिली. त्यातील एक आश्वासन म्हणजे दोन कोटी तरुणांना रोजगार दिला जाणार असल्याची घोषणा देखील केली होती. मात्र या साडेचार वर्षात तरुणांना रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण बेरोजगार झाला असून त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाची दखल सरकारने न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिला. यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.