Pune : पोलिसांच्या कानाखाली मारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज-कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला (Pune) मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या महिलेची नाव आहे. ही महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलची अध्यक्ष आहे. यासंदर्भात पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी तक्रार दिली आहे.

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आषाढी वारी निमित्त कासुर्डी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

 

पोलीस नाईक नितीन कोहक हे त्यांच्या सहकार्यासह त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. दरम्यान वंदना मोहिते या एका चार चाकी कारने त्या ठिकाणी आल्या.

 

यावेळी पुण्याकडे जाण्यावरून त्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांसोबत वाद घातला. वंदना मोहिते यांनी नितीन कोहक यांच्या कानाखाली देखील मारली. त्यानंतर गाडीतून खाली उतरत त्यांनी बॅरिकेट बाजूला केले आणि निघून गेल्या.

 

दरम्यान यवत पोलिसांनी या प्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणण्या प्रकरणी वंदना मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी रात्री वंदना मोहिते यांना राहत्या घरातून अटक (Pune)  केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.