Pune : दत्तवाडी पोलीस स्टेशनचे नाव बदलले; आता ओळखणार या नावाने…

एमपीसी न्यूज-पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनचे नाव ( Pune) अखेर बदलण्यात आले आहे. या पोलीस स्टेशनची ओळख आता दत्तवाडी ऐवजी पर्वती पोलीस स्टेशन अशी असणार आहे. पर्वती टेकडी परिसराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व घेऊन राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कक्ष अधिकारी असलेल्या रूपाली कबरे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

काही वर्षांपूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्याची विभाजन करून दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. 2006 ते 2007 च्या दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात एक हजाराहून अधिक गुन्हे दाखल होत होते.

त्यामुळे वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन 2007 मध्येच दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. त्यासाठी पर्वती परिसरात नवीन इमारत बांधण्यात आली आणि दत्तवाडी पोलीस स्टेशन असे नामकरणही करण्यात आले होते.

PMPML : पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार 900 नवीन बसेस- चंद्रकांत पाटील

दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्तवाडी परिसरात आधीपासूनच दत्तवाडी पोलीस चौकी अस्तित्वात होती. त्यामुळे नामसाधर्म्यम्यामुळे अनेक नागरिक दत्तवाडी पोलीस स्टेशन ऐवजी दत्तवाडी पोलीस चौकीतच जात होते.

अनेकांचा गोंधळही होत होता. त्यामुळे दत्तवाडी पोलीस स्टेशनचे नाव बदलून पर्वती करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात होती. त्यानुसार अखेर दत्तवाडी पोलीस स्टेशनचे नाव बदलून पर्वती पोलीस ठाणे करण्यात ( Pune) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.