Maharashtra : आयएएस अधिकारी अनिल रामोडला निलंबित करा; विभागीय आयुक्तांचे सरकारला पत्र

एमपीसी न्यूज-भूसंपादन प्रकरणात अतिरिक्त मोबदला ( Maharashtra)  देण्यासाठी आठ लाख रुपये लाख स्वीकारताना अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांना सीबीआयने रंगेहात पकडले होते. त्यानंतर आता अनिल रामोड याला सरकारने निलंबित करावे अशी मागणी केली जात आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने राज्य सरकारकडे यासंदर्भातचा प्रस्ताव पाठवला आहे.

सोलापूर महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला वाढवून देण्यात यावा अशी मागणी एका शेतकऱ्याने अतिरिक्त आयुक्त असलेल्या अनिल रामोड यांच्याकडे केली होती. मात्र रामोड यांनी या शेतकऱ्याकडे आठ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

लाच देणे मान्य नसल्याने या शेतकऱ्याने याबाबतची तक्रार सीबीआय कडे केली होती. त्यानंतर सीबीआयने पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयातच लाच स्वीकारताना रामोड याला रंगेहात पकडले.

Pune : पोलिसांच्या कानाखाली मारल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक

रामोड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयीन कोठडीतून बाहेर पडल्यानंतर तो विभागीय आयुक्तालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार करेल त्यामुळे त्याला निलंबित करण्यात यावे अशी मागणी सीबीआयने केली होती. सीबीआयने या संदर्भातील पत्र विभागीय आयुक्तालयास पाठवले होते.

त्यानंतर आता विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला याबाबतचे पत्र पाठवले असून रामोड यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी या पत्रात करण्यात ( Maharashtra) आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.