Pimpri : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – आज (शुक्रवारी, दि. 16) पिंपरी चिंचवड दौऱ्यावर (Pimpri )आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत त्यांच्या हस्ते विविध दाखले लाभाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप होणार आहे. तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाकड आणि निगडी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी आदेश दिले आहेत.

मयुरेश्वर गणपती मंदिर डांगे चौक ते रिव्हर व्ह्यु चौक चिंचवड पर्यंत जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर शुक्रवारी (दि. 16) जड / अवजड वाहनांस प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

यासाठी डांगे चौकातून चिंचवडकडे जाणारे वाहन चालक हे डांगे चौक अंडरपास मधून न जाता सर्व्हीस रोडने डांगे चौकातून डावीकडे ताथवडे गाव मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

Maharashtra : लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोडला निलंबित करा; विभागीय आयुक्तांचे सरकारला पत्र

महावीर चौकातून डांगे चौकाकडे जाणारे वाहने सरळ डांगे चौकाकडे न जाता रिव्हर चौकातून इच्छित स्थळी जातील.

शुक्रवारी दुपारी एक ते मध्यरात्री बारा पर्यंत त्रिवेणीनगरकडून व टिळक चौकाकडून येणारी वाहने भक्ती शक्ती चौकामार्गे रावेतकडे न जाता देहूरोड मार्गे जातील.

तसेच शुक्रवारी दुपारी एक ते मध्यरात्री बारा पर्यंत देहुरोडकडून भक्ती शक्तीकडे येणारी जड वाहतूक ही सेंट्रल (Pimpri ) चौकातून रावेतमार्गे वळविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.