Pune News: रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पुणे दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघटनात्मक कामाच्या विविध बैठकांमध्ये त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अशी माहिती रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी दिली.

रा.स्व. संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणीची बैठक 11 डिसेंबर रोजी पुण्यात मोतीबाग येथे होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 12 डिसेंबर रोजी काही स्वयंसेवकांच्या भेटी आणि संघ कार्यकर्त्यांची बैठक आहे.
तसेच 13 डिसेंबर रोजी देहू येथे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील प्रचारकांच्या बैठकीस सरसंघचालक उपस्थित राहतील.

त्यांचा संपूर्ण प्रवास नियमित संघटनात्मक कार्यासाठी असून त्यात कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही. असे डॉ. दबडघाव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.